फसवणूक मुक्त ग्राहक हित संकल्पना राबवणार

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  : ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून. प्रत्येक घटकांनी जागरूकपणे काम केल्यास फसवणूक मुक्त ग्राहक हित संकल्पना खऱ्या अर्थाने राबवल्या जाईल. यासाठी सजगपणे प्रत्येकाने आपापले काम करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने मान्यवरांनी व्यक्त केले.

दि. २४ बुधवारी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. निवासी नायब तहसीलदार शेख हरून यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष संजय कुलकर्णी. वकील संघाचे तालुकाध्यक्ष एडवोकेट अशोक तायडे एडवोकेट संतोष झाल्टे. एडवोकेट सनी हट्टीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात येऊन स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

ग्राहक दिन व त्याचे महत्त्व याचे महत्त्व अधोरेखित करीत मान्यवरांनी डोळसपणाने प्रत्येक घटकाने काम केल्यास ग्राहकांची फसवणूक होणार नाही यामुळे जागतिक पातळीवर. देशाच्या भरभराटीला गती येईल अशी भावना व्यक्त केली. ग्राहकांनी देखील जागरूक राहून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक अव्वल कारकून आशिष आवटी यांनी केले संचालन स्वस्त धान्य संघटनेचे तालुका अध्यक्ष शेरखान पठाण यांनी केले.

 तर नायब तहसीलदार बळीराम मुंडे यांनी आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे, राजू रोजेकर, दुर्गाबाई पवार, विनायक जोशी, गजानन मरकड, मधुकर बर्डे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.